Bill Gates and Paula Hurd : अब्जाधीश बिल गेट्स वयाच्या 69व्या वर्षी पुन्हा प्रेमात; व्हॅलेनटाईन तोंडावर असतानाच सांगितलं गर्लफ्रेंडचं नाव!

Bill Gates and Paula Hurd मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी त्यांची नवीन गर्लफ्रेंड पॉला हर्डसोबतच्या नात्याचा खुलासा केला आहे. “मी भाग्यवान आहे की मला एक गंभीर मैत्रीण आहे, पॉला,” असे गेट्स यांनी मंगळवारी एका टीव्ही मुलाखतीत म्हणाले. “आम्ही चांगला वेळ घालवत आहोत, ऑलिम्पिकला जात आहोत आणि बऱ्याच छान गोष्टी करत आहोत.” 2023 पासून बिल गेट्स पॉला हर्डच्या प्रेमात पडल्याची चर्चा आहे आणि दोघेही अनेक प्रसंगी एकत्र दिसले आहेत. बिल गेट्स यांनी 2021 मध्ये मलिंदा गेट्स यांच्यापासून घटस्फोट घेतला. अवघ्या दोन वर्षांनंतर ते पॉलासोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.
पॉला हर्ड या ओरॅकलचे दिवंगत सीईओ मार्क हर्ड यांच्या पत्नी आहेत. मार्क हर्ड यांचे 2019 मध्ये कर्करोगाने निधन झाले. पॉलाला मार्कपासून कॅथरीन आणि केली या दोन मुली आहेत. पॉला यांच्या पतीने त्यांना सुमारे $500 दशलक्ष किमतीची मालमत्ता सोडली. पॉला यांनी टेक्सास विद्यापीठातून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी मिळवली आहे. पॉला हर्ड नॅशनल कॅश रजिस्टर नावाच्या कंपनीत काम करत होत्या. पॉला यांनी शैक्षणिक आणि सेवाभावी संस्थांनाही भरपूर देणगी दिली आहे.
टेनिस सामन्यादरम्यान भेट झाली
2015 मध्ये एका टेनिस सामन्यादरम्यान बिल गेट्स आणि पॉला यांची भेट झाली होती. दोघांनाही टेनिसचे वेड आहे. दोघांचे अनेक कॉमन मित्र आहेत. यानिमित्ताने ते वारंवार भेटत राहिले. पॉला यांच्या पतीच्या मृत्यूनंतर आणि बिल गेट्स यांच्या घटस्फोटानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आता बिल गेट्स यांनीही हे नाते जाहीरपणे स्वीकारले आहे.
लग्नाचा शेवट झाल्याबद्दल पश्चात्ताप झाला
अलीकडेच, टाइम्स ऑफ लंडनला दिलेल्या मुलाखतीत, 69 वर्षीय बिल गेट्स यांनी कबूल केले की मेलिंडासोबतचे त्यांचे लग्न संपल्याबद्दल त्यांना पश्चाताप होत आहे. ते म्हणाले की, “घटस्फोटाचा अनुभव चांगला नव्हता. पण आम्हाला तीन मुले आहेत आणि आम्ही एकत्र केलेल्या गोष्टी अमूल्य आहेत. हे नाते कायम टिकणार नाही हे जरी मला माहीत असते तरी मी पुन्हा तेच केले असते.” “मी घटस्फोटातून पुढे गेलो आहे आणि मेलिंडा चांगल्या ठिकाणी आहे,” गेट्स मंगळवारी टुडे शोमध्ये म्हणाले. “माझ्याकडे खूप काम आहे जे मला आवडते, म्हणून मी कशाचीही तक्रार करत नाही.”
महिला सहकाऱ्यासोबतही नाव जोडले गेले
बिल गेट्सचे नाव कंपनीच्या एका महिला सहकाऱ्यासोबतही जोडले गेले होते. 2019 मध्ये दोघांमध्ये अफेअर असल्याच्या बातम्या आल्या होत्या, मायक्रोसॉफ्टच्या एका महिला अभियंत्याने बिल गेट्स यांच्यासोबतच्या नातेसंबंधाचा खुलासा केला होता. बिल गेट्स यांच्या पत्नी मेलिंडा यांनीही एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, त्यांना बिल गेट्स यांच्या अफेअरबद्दल जाणून घ्यायचे आहे.