अंजाम

Rachin Ravindra Injury Update : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी किवी संघात खळबळ! तिरंगा मालिकेतील फायनलमधून रचिन रवींद्र बाहेर; काही दिवसापूर्वी फुटले होते डोके

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होण्यास फक्त 5 दिवसांपेक्षा कमी दिवस राहिले आहे.

Rachin Ravindra ruled out of final vs Pakistan : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू होण्यास फक्त 5 दिवसांपेक्षा कमी दिवस राहिले आहे. या स्पर्धेचा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाकिस्तानमध्ये तिरंगी मालिका खेळवली जात आहे.

या मालिकेदरम्यान, न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र फलंदाजी करताना डोक्याला चेंडू लागला होता. आता त्याच्या दुखापतीबद्दलची अपडेट समोर आली आहे. न्यूझीलंडची स्टार अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील अंतिम सामन्यातून बाहेर पडला आहे. ही अपडेट स्वतः न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी शेअर केली आहे.

रचिन रवींद्रच्या दुखापतीबद्दल स्टेडने दिले अपडेट

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना 14 फेब्रुवारी रोजी कराचीतील नॅशनल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या अंतिम सामन्यापूर्वी, गॅरी स्टीडने रचिन रवींद्रच्या दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे. त्याने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून या अष्टपैलू खेळाडूला डोकेदुखीचा त्रास होत होता, परंतु आता त्याची प्रकृती सुधारत आहे.

प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले, “चांगली बातमी अशी आहे की तो हळूहळू बरा होत आहे. पण आम्ही वैद्यकीय प्रोटोकॉलचे पालन करत आहोत. त्याला काही दिवसांपासून डोकेदुखी होती, जी आता थोडी कमी झाली आहे.  त्याने पहिल्यांदाच नेटमध्ये फलंदाजी केली, जो एक चांगला संकेत आहे. परंतु सामने खेळण्यासाठी तंदुरुस्त घोषित होण्यापूर्वी त्याला आणखी काही गोष्टी पार कराव्या लागतील.

रचिनच्या दुखापतीमुळे किवींचा खेळ बिघडला?

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फक्त पाच दिवस आधी तिरंगी मालिकेचा हा अंतिम सामना खेळला जात आहे. ज्यामध्ये न्यूझीलंडचा महत्त्वाचा खेळाडू रचिन रवींद्र खेळू शकणार नाही. आता जर त्याची दुखापत सुधारली नाही तर ती न्यूझीलंडसाठी डोकेदुखी ठरू शकते. कारण चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे.

रचिन रवींद्रला कशी झाली दुखापत?

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना रवींद्रला दुखापत झाली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षण करताना त्याने एरियल शॉट खेळला. रवींद्रही झेल घेण्यासाठी पूर्णपणे तयार दिसत होता. पण, शेवटच्या क्षणी असे वाटले की प्रकाशामुळे तो चेंडू पूर्णपणे चुकला आणि चेंडू थेट त्याच्या तोंडावर जाऊन लागला. यानंतर, तो तोंड धरून मैदानात बसला. सपोर्ट स्टाफमधील काही लोक धावत मैदानात आले आणि त्यांनी दुखापत झालेल्या भागाला टॉवेलने दाबले आणि रवींद्रला मैदानाबाहेर नेले. हे दृश्य भयानक होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button