लेख

फुकटाची दारू, हँगओव्हर लिव्ह, च्या मारी लय भन्नाट ऑफर देणारी कोणती कंपनी हाय ही?; नेमकी भानगड तरी काय?

जपानची सॉफ्टवेअर कंपनी ट्रस्ट रिंगने आपल्या कर्मचाऱ्यांना भन्नाट आणि मोठी ऑफर दिली आहे. मोफत दारू आणि हँग ओव्हर लिव्ह देण्याची ऑफर या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिली आहे. नव्या टॅलेंटला आकर्षित करण्यासाठी आणि अनौपचारिक कार्य संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. काही लोक या पॉलिसीचं कौतुक करत आहेत. तर काही लोक या धोरणावर सवाल उपस्थित करत आहेत.

जपानच्या ओसाका येथील कंपनी ट्रस्ट रिंग (Trust Ring Co., Ltd.) आपल्या खास हायरिंग स्ट्रॅटेजीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत दारू आणि हँगओव्हर लिव्ह सारखे फायदे देण्याची घोषणा केली आहे. नवीन टॅलेंट आपल्याच कंपनीत यावं यासाठी या कंपनीने हा फंडा वापरला आहे. वेगळ्या प्रकारचं कामाचं वातावरण तयार करण्याचा या कंपनीचा प्रयत्न आहे.

मोठ्या कंपनीशी टक्कर

अशा प्रकारची ऑफर म्हणजे छोट्या कंपन्यांकडून मोठ्या कंपन्यांना टक्कर देण्याच्या प्रयत्नाचा एक भाग असू शकतो. भरगच्च पगार देऊन त्यावर अधिक बेनिफिट देण्याचा हा त्यामागचा हेतू आहे. आता ही पॉलिसी किती यशस्वी होईल हे काळच ठरवेल. मात्र, अशा प्रकारची ऑफर देऊन या कंपनीने फक्त जपानमधीलच नव्हे तर जगातील कंपन्यांचं लक्ष आपल्याकडे खेचलं आहे. त्यामुळ आता जगभरातील कंपन्यांमध्ये ही ऑफर चांगली की वाईट यावरून वाद झडताना दिसत आहेत.

सीईओ देतोय सर्व्हिस

आरामदायक आणि सोशल वातावरण असेल तर कर्मचारी खूश असतात. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते आणि उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होते. मोफत दारू आणि हँगओव्हर लिव्ह देणं हा त्याचाच एक भाग आहे. कंपनीचे सीईओ ताकुया सुगिउरा हे नव्या कर्मचाऱ्यांचं स्वागत करताना स्वत: त्यांना ड्रिंक्स सर्व्ह करतात. कंपनीत एक अनौपचारिक वातावरण तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

प्रत्येकाचीच वेगळी मते

काही लोक ही पॉलिसी म्हणजे स्वप्न असल्याचं म्हणत आहेत. बराच काळ काम केल्यानंतर मोफत दारू आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हँगओव्हर लिव्हची चिंता करू नका, अनेकांना ही ऑफर आकर्षक वाटेल. तर काही लोक या पॉलिसीवर प्रश्नही उपस्थित करत आहेत. खरोखरच अशा प्रकारची ऑफर देऊन कंपनीचे उत्पादन वाढणार आहे का? की हा एक खतरनाक प्रयोग ठरणार आहे? असा सवाल हे लोक करत आहेत.

विशेष म्हणजे कंपनी केवळ मोफतमध्ये दारू देत नाहीये. तर दुसऱ्या दिवशी भरपगारी हँगओव्हर लिव्हही देत आहे. म्हणजे कंपनीला कर्मचाऱ्यांना आराम करण्यासाठी वेळ द्यायचा आहे, हेच यातून दिसून येतं. ही पॉलिसी इतर कंपन्यांपेक्षा वेगळी असल्याचं या कंपनीचं म्हणणं आहे. नवीन प्रतिभेला आकर्षिक करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं या कंपनीचं म्हणणं आहे.

या कंपनीत सुरुवातीला 222,000 येन (सुमारे 1.27 लाख रुपये) पगार असणार आहे। या शिवाय 20 तासाचा ओव्हरटाइमही दिला जाणार आहे. मोफत दारू आणि हँगओव्हर लिव्ह आहेच. मग आता सांगा कर्मचारी या कंपनीकडे नाही तर कुठे आकर्षित होतील?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button