अंजाम
WPL 2025 : बंगळुरू-मुंबई नाही तर ‘या’ दोन टीमला मिळाले नवे सेनापती
WPL २०२५ : १४ फेब्रुवारी पासून सुरु होणार 'वुमन प्रीमिअर लीग' चा तिसरा सिझन, दोन टीम ला मिळाले नवीन कर्णधार


‘वूमन्स प्रीमियर लीग’ चा तिसरा हंगाम 14 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. या हंगामामध्ये अनेक फ्रेंचायझीने आपल्या संघाचे कर्णधार बदलण्याले आहेत.
2/9

वूमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामात कोणत्या दोन संघांच्या कर्णधारांमध्ये बदल करण्यात आला आहे ते जाणून घेऊया.
3/9

WPL चा शेवटचा हंगाम स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकला होता.
4/9

हरमनप्रीत कौर ही मुंबई इंडियन्स संघाची कर्णधार आहे, जी वूमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाची विजेती होती.
5/9

WPL 2024 या हंगामात स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजेतेपद जिंकले होते. या हंगामातही आरसीबी ची धुरा स्मृती च्या खांद्यावर आहे.
6/9

दिल्ली कॅपिटल्सबद्दल बोलायचे झाले तर, या हंगामात आपला कर्णधार बदललेला नाही. ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग WPL 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना दिसेल.
7/9

WPL 2025 च्या तिसऱ्या हंगामात ज्या दोन संघांनी त्यांचे कर्णधार बदलले आहेत ते म्हणजे गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स.
8/9

यूपी वॉरियर्सने दीप्ती शर्माला नवीन कर्णधार बनवले आहे.
9/9

दुसरीकडे, गुजरात जायंट्सची धुरा अॅशले गार्डनरच्या खांद्यावर आहे