व्यवसाय
आरबीआयने मुंबईतील बँकेवर कारवाईचा वरवंटा फिरवला, शाखेबाहेर ठेवीदारांची प्रचंड गर्दी
RBI New India Co Op Bank : आरबीआयनं मुंबईतील न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातल्यानं गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.

1/5

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतील न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले आहेत. बँकेचं कामकाज काल म्हणजेच गुरुवारी बंद झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांच्या काळासाठी निर्बंध लादण्यात आले आहेत.
2/5

निर्बंधाची माहिती मिळताच लोक अंधेरीतील न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेबाहेर मोठी गर्दी केली आहे. सुरक्षेच्या कारणामुळं या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
3/5

न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेला कर्ज देण्यास आणि ठेवी स्वीकारण्यास निर्बंध घालण्यात आली आहे. ठेवीदारांनी आमचे पैसे कधी मिळतील, असा सवाल केला आहे.
4/5

बँकेवर निर्बंध घातल्याचा मेसेज आला त्यामुळं इथं आल्याचं ठेवीदारानं सांगितलं आहे. आरबीआयनं न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातल्यानंतर गुंतवणूकदार मोठ्या संख्येनं ठेवींचं काय होणार या विचारातून जमा झाले आहेत.
5/5

आरबीआयनं सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ठेवी काढण्यास निर्बंध घातले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्यांनी ज्यांच्यामुळं बँक बुडाली आहे, त्यांच्यावर कारवाई होईल, असं म्हटलं आहे.